नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकाजवळील अरुणाचल प्रदेश भवनला काल (सोमवार 6, नोव्हेंबर ) आग लागली. इमारतीच्या आठव्या मजल्यावर आग लागल्याचे वृत्त आहे. आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. वाशीमधील सेक्टर 30 मध्ये रेल्वे स्थानकाजवळ अरुणाचल प्रदेश भवन आहे. या इमारतीला आज आग लागली. सुरुवातीला आठव्या मजल्यावर धुराचे लोट दिसत होते. त्यानंतर नवव्या मजल्यावरूनही मोठ्या प्रमाणात धूर निघत होता. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. जवानांनी आठव्या मजल्यावर असलेल्या कामगारांना सुखरुप बाहेर काढले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे सांगण्यात आले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews